'सुचेतस आर्टस' आयोजित,            

'उत्कृष्ट मराठी कथासंग्रह / कादंबरी पुरस्कार २०२'

                   निकाल

सस्नेह नमस्कार 

महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथासंग्रह / कादंबरी ह्या साहित्यकृतीचा गौरव करावा आणि मराठी साहीत्यिकांना प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’ ने खालील पुरस्कार देण्याचे योजिले होते.

१. कै. सर्जेराव माने स्मृती कादंबरी पुरस्कार    
२. कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी) स्मृती कथासंग्रह पुरस्कार प्रत्येकी रोख रक्कम ११०० रुपये व सन्मानपत्र

पुरस्कारासाठी लेखक/ प्रकाशकांकडून कथासंग्रह व कादंबरी मागवण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी देखील लेखकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद! सर्व साहीत्य खालील निकषावर तपासले गेले.

"लेखनशैली / शुध्दलेखन (प्रूफ चेकिंग) / धाटणी (जॉनर) / साहीत्याचा दर्जा 

पुरस्कारासाठी आलेले सर्व कथासंग्रह व कादंबऱ्या आमच्या मान्यवर परीक्षकांनी काळजीपूर्वक वाचले. समीक्षण म्हणून साहित्याकडे न बघता एक वाचक म्हणून त्यांचे परीक्षण झाले. नाशिकचे सर्वश्रुत लेखक श्री. श्रीराम शिंगणे व पुण्याच्या बहुश्रुत वाचक सौ. अश्विनी कुलकर्णी यांनी आपला बहुमोल वेळ या परीक्षणासाठी दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!

कादंबरी प्रकारात, ‘वायंगी’ हे पुस्तक सर्व निकषांवर पुरेपूर उतरले. यावर्षी देखील अपेक्षेनुसार दर्जेदार कथासंग्रह मिळाला नाही. पण स्पेशल आणि वेगळ्या कॅटेगरीत ‘रत्नगीतार्या’ ह्या पुस्तकाने पुरस्कार पटकावला. हे पुरस्कार जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

“कै. सर्जेराव माने स्मृती कादंबरी पुरस्कार” 

विजेती कादंबरी ‘वायंगी’ - लेखक श्री अविनाश महाडीक, मुंबई 

‘कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी) स्मृती कथासंग्रह पुरस्कार’ 

विजेते स्पेशल पुस्तक रत्नगीतार्या’ - लेखक श्री गोपाळ शंकर वैद्य, पुणे 

रोख रक्कम ११०० रुपये व सन्मानपत्र

पुरस्कारांची रक्कम व मानपत्र लवकरच पाठवले जाईल.

संपर्क - 'सुचेतस आर्टस' – 9921095542 (Pls WhatsApp if any Query)

OUR COURSES

01.

Suchetas Voiceover & Editing Combo


lEARN NOW

02.

Suchetas Voiceover Training Programme


LEARN NOW

03.

Suchetas Audio Editing Training Programme


LEARN NOW

'सुचेतस आर्टस' आयोजित, 

'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२' (वर्ष चौथे ) 

नमस्कार, 

'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. ह्या वर्षी आम्ही 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत. ही स्पर्धा ऑनलाईन आहे. 

🌷🌷सुचेतस आर्टस अभिवाचन स्पर्धा २०२४ 🌷🌷विजेते स्पर्धक 🙂👍🏻

प्रथम क्रमांक - शिल्पा धामणस्कर
दुसरा क्रमांक - प्रिया निफाडकर
तिसरा क्रमांक - स्नेहल म्हात्रे

सुचेतस व परिक्षक यांच्या संयुक्त विचाराने उत्तेजनार्थ ३ नंबर जाहीर करत आहोत 🙏 🙂🌷

१. ओंकार फडके
2. गायत्री पटवर्धन
3. प्रीती अष्टपुत्रे

🌷🌷 विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन 🌷🌷श्रीमती उज्वला केळकर यांनी परीक्षण केले 🙏 🙂🌷

संपर्क - 'सुचेतस आर्टस' – 9921095542 

ऑडिओ पाठवायचा Email id –  suchetasindia.arts@gmail.com

Facebook Page - https://www.facebook.com/Suchetasarts

Suchetas is running a 'Kids YouTube channel' called "Kilbil Gani Gosthi".
In Marathi and for Marathi.